‘या’ महिलांना हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त

Businesswoman in office
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका हे जगभरात मृत्यूचे प्रमुख कारण मानले जाते. यापूर्वी या संदर्भात केलेल्या अभ्यासात असं म्हटलं होतं की, पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असला तरी, स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र आता नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात चंदीगडच्या कार्डिओलॉजी विभागाच्या डॉक्टरांनी एक मोठा दावा केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित विभागाच्या सहाय्यक प्राध्यापिका डॉ. नीलम दहिया यांनी अनेक महिलांना सावध केलंय. त्या म्हणाल्या की लठ्ठपणाने ग्रस्त महिलांना हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका जास्त असू शकतो. ज्या महिलांचे वजन सामान्यपेक्षा जास्त आहे अशा महिलांनी हृदयाच्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यावी.
ML/ML/PGB 1 May 2024