हृदयरोग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावे : डॉ अभिलाश मिश्रा
मुंबई- हृदयरोग टाळण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी वर्षातून एकदा कोलेस्ट्रॉल तपासून घ्यावे असे प्रतिपादन सुप्रसिध्द हृदयरोग तज्ज्ञ (कारीओलॉजिस्ट) डॉ. अभिलाश मिश्रा यांनी विक्रोळी कन्नमवार नगरात केले. धर्मवीर संभाजी मैदानातील प्रभात मित्र मंडळाच्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करताना डॉ. अभिलाश मिश्रा बोलत होते.
जागतिक ह्रदयदिनाचे औचित्य साधून सोमवार दि.३ नोव्हेंबर २०२५ रोजी इंडियन मेडिकल असोसिएशन एनईबीएस ब्रांचचे
अध्यक्ष डाॅ. हरिशचंद्र पांचाळ यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी हृदयाच्या आजारासंबंधी काळजी कशी घ्यावी यावर डॉ.अभिलाश मिश्रा यांचे मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आपणास छातीत दुखले, घाम आला, चालताना दम लागला या समस्या छोट्या नाहीत. यासाठी आपण डॉक्टरांचा सद्धा घेतला पाहिजे. हार्ट डिसीज (हृदयरोग) हा सायलंट किलर आहे. तो ज्येष्ठ काय? तरुणांना कोणालाही होऊ शकतो. तो अनुवांशिक आहे वडिलांना ५५ वर्षी हार्ट ॲटक आला तर मुलाला दहा वर्ष अगोदर तो येऊ शकतो. आईला, ६० वर्षी हार्ट अटॅक आला तर मुलीला दहा वर्ष अगोदर येऊ शकतो याकडे डॉ अभिलाश मिश्रा यांनी लक्ष्य वेधले.
हृदयरोग रुग्णांनी डायट वर भर दिला पाहिजे. धुम्रपान व दारू पिणे टाळले पाहिजे. असे सांगताना प्रत्येकाने ECG चा रिपोर्ट आपल्या घरच्यांकडे व स्वतःच्या मोबाईल मध्ये ठेवला पाहिजे. त्यामुळे समस्या उद्भभवली तर इतर चाचण्या घेण्याची गरज भासणार नाही. डायट करताना मिठाचा वापर कमी करावा. आठवड्याच्या पाच दिवसातून चालण्याचा, व्यायाम करावा.असे डॉ.मिश्रा म्हणाले.कोविड लस घेतलेत्यांना हार्ट ॲटक आले आहेत हे सिद्ध झाले आहे. हे एका प्रश्नाला उत्तर देताना डॉ. मिश्रा यांनी सांगितले.
मंडळाचे सल्लागार व फॅमिली डॉ. हरिशचंद्र पांचाळ यांनी तरुण डॉक्टरांमध्ये मृत्यूचे प्रमाण वाढले आहे याकडे चिंता व्यक्त केली. यामध्ये हार्ट ॲटकचे प्रमाण आहे असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभात मित्र मंडळाचे सचिव ज्येष्ठ पत्रकार नासिकेत पानसरे यांनी तर आभार उपाध्यक्ष निवृत्ती मस्के यांनी केले. व्याख्यानानंतर ज्येष्ठ नागरिकांची मधुमेह व रक्तदाब यांची चाचणी करण्यात आली. कार्यक्रमास मंडळाचे खजिनदार गौतम डांगळे, चित्रोळीकार मुकुंद कुलकर्णी,श्रध्दानंद निकम,बबन माने,आदि मान्यवर उपस्थित होते.KK/ML/MS