मुंबई पालिका प्रभागरचनेबद्दल 20 डिसेंबरला सुनावणी
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुंबई महानगरपालिकेची प्रभागसंख्या कमी करण्याच्या कायद्याला आव्हान देणारी याचिका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे. Hearing on 20th December regarding the formation of Mumbai Municipal Corporation
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) माजी नगरसेवक राजू श्रीपाद पेडणेकर यांनी वकील देवदत्त पालोदकर यांच्यामार्फत ही याचिका करून शिंदे सरकारच्या प्रभाग संख्या कमी करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायालयाने या याचिकेवर राज्य सरकार, राज्य निवडणूक आयोग, नगरविकास विभागाला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले होते. सरकारने बुधवारी प्रतिज्ञापत्र दाखल करून याचिकेवर भूमिका स्पष्ट केली.
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सरकारने वाढवलेली प्रभागसंख्या २३६ वरून पुन्हा २२७ करण्याबाबतच्या कायद्याला आव्हान देणारी याचिकेवर येत्या 20 डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
ML/KA/PGB
30 Nov .2022