राज्यात २ कोटी पेक्षा अधिक पुरुषांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पार

 राज्यात २ कोटी पेक्षा अधिक पुरुषांच्या आरोग्य तपासणीचा टप्पा पार

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून १८ वर्षांवरील पुरुषांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीसाठी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सुरु करण्यात आलेल्या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ अभियानांतर्गत आतापर्यंत २ कोटी पेक्षा अधिक पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे.

या अभियानांतर्गत राज्यातील सुमारे ४ कोटी ६७ लाख पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागामार्फत ठेवण्यात आले आहे.

या अभियानांतर्गत २३ डिसेंबर २०२३ पर्यंत १८ वर्षांवरील २ कोटी ०५ लाख ४२ हजार १६१ पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आलेली आहे. त्यापैकी १ कोटी ९५ लाख ६९ हजार ८०९ लाभार्थ्यांच्या आवश्यक त्या चाचण्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये करण्यात आलेल्या आहेत.

ही मोहीम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात येणार असून, त्यानंतर गरजेनुसार मोहिमेचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

आरोग्यवर्धिनी केंद्र, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरी भागातील सामुदायिक आरोग्य केंद्र, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सामान्य रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय या स्तरावर रुग्णांना आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत.

यासर्व आरोग्य संस्थांमध्ये 18 वर्षे वरील पुरुषांची मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक चाचण्या, गरजेनुसार ईसीजी, सिटीस्कॅन, एक्स-रे इत्यादी सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत.

त्याचप्रमाणे, गरजेनुसार रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियांसाठी वैद्यकीय महाविद्यालय तसेच शासनमान्य महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जाणार आहे.

या ‘निरोगी आरोग्य तरुणाईचे, वैभव महाराष्ट्राचे’ या अभियानासाठी विशेष अँपची निर्मिती करण्यात आलेली आहे. सदर अँपच्या माध्यमातून सर्व आरोग्य केंद्राच्या ठिकाणी आरोग्य कर्मचारी तसेच वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत रुग्णांची नोंदणी, त्यांना दिलेले औषध उपचार तसेच करण्यात आलेल्या शस्त्रक्रिया, करण्यात आलेल्या चाचण्या, या माहितीची नोंद त्या ठिकाणी केली जाते. Health screening of more than 2 crore men has been completed in the state

ML/KA/PGB
26 Dec 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *