हतनूर धरणाचे 14 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले
जळगाव, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी मध्य प्रदेश आणि विदर्भासह हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणाच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. हतनूर धरणाचे 41 पैकी 14 दरवाजे हे पूर्णपणे उघडण्यात आले असून धरणातून तापी नदी पात्रात 69 हजार 217 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तापी नदी पात्रात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.
ML/ML/PGB
12 Aug 2024