हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकाने गणितीय सिद्धांताने मांडला देवाच्या अस्तित्वाचा दावा

 हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकाने  गणितीय सिद्धांताने मांडला देवाच्या अस्तित्वाचा दावा

वॉशिंग्टन,दि.१०(एमएमसी न्यूज नेटवर्क):-देव आहे की नाही यावर शेकडो वर्षांपासून चर्चा सुरु आहे. ब्रह्मांडाचे रहस्य उलगडून सांगणारे स्टीफन हॉकिन्स यांनी देवाचे अस्तित्व नाकारले होते. आता मात्र हॉर्वर्ड विद्यापीठातील एक संशोधक डॉ. विली सून यांनी देवाचे अस्तित्व असल्याचा दावा केला आहे.डॉ. सून हे हॉर्वर्ड विद्यापीठातील एक खगोलशास्त्रज्ञ असून ते एअरोस्पेस इंजिनीयरही आहेत. आपल्या दाव्यासाठी त्यांनी एक गणिती सूत्र मांडले असून त्याला त्यांनी फाईन ट्यूनिंग आर्ग्युमेंट असे नाव दिले आहे.

या जगाचे संतुलन एक परमशक्ती करत आहे, असे गणितीय सूत्र या आधी केंब्रिज विद्यापीठातील गणिताचे प्राध्यापक संशोधक पॉल डिरॉक यांनी मांडले होते. जगातील स्थिरांक ज्या पद्धतीने जुळतात, या आधारे जगाच्या भौतिक नियमांचे संतुलन त्यांनी गणितीय सिद्धांताच्या माध्यमातून पुढे आणले होते. डॉ. सून यांनी डिरॉक यांच्याच सिद्धांताचा आधार घेत आपले गणिती सूत्र मांडून देवाचे अस्तित्व असल्याचा दावा केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ब्रह्मांडाचे भौतिक नियम इतके अचूक आहेत की त्याला योगायोग मानता येणार नाही. सर्वच गोष्टी या जीवनाला मदत करत असतात. गणित आणि ब्रह्मांड यांच्यामध्ये एक सुसंवाद आहे. आपले विश्व एका परिपूर्ण गणितीय संतुलनावर कार्य करते. जर हे संतुलन अगदी थोडेसेही बिघडले असते, तर जीवन अस्तित्वात आलेच नसते. त्यामुळेच देवाचा शोध हा आकाशातील ग्रह ताऱ्यांमधून घेता येणार नाही तर तो गणिताच्या सूत्रातून घेता येणार आहे.

या मुद्द्यावर त्यांनी काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत. त्यात गुरुत्वाकर्षणाचा अचूक समतोलाचा समावेश आहे. गुरुत्वाकर्षणाची तीव्रता किंचित बदलली असती, तर विश्वाची रचना कोसळली असती. भौतिकशास्त्राचे स्थिरांक ही दुसरी गोष्ट आहे. विज्ञानाने सिद्ध केले आहे की पृथ्वीवरील जीवनासाठी आवश्यक असलेल्या भौतिकशास्त्रीय नियमांमध्ये अत्यंत सूक्ष्म असा समतोल आहे. जीवनाची शक्यता ही आणखी एक गोष्ट असून इतक्या अचूक संयोगाने जीवनाची निर्मिती होणे एक निव्वळ योगायोग असू शकत नाही.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *