हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढणार

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. शरद पवारांच्या चर्चेनंतर मी त्यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतोय असं सांगत हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. याबाबत आपण देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करून त्यानंतर निर्णय घेतल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केलं. त्यामुळे त्यांच्यात आणि पक्षाच्या राज्यातील नेत्यांमध्ये याबाबत चर्चा झाल्याचं आता स्पष्ट झालं आहे. राष्ट्रवादीकडून ते विधानसभा निवडणूक लढविणार आहेत
TR/ML/PGB
4 Oct 2024