‘हॅरी पॉटर’ वेब सीरिज, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

 ‘हॅरी पॉटर’ वेब सीरिज, लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, दि. १५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : HBO हे लोकप्रिय नेटवर्क आता Harry Potter या जगप्रसिद्ध क्लासिक पुस्तक मालिकेवर आधारित नवी वेब सीरिज आणण्यासाठी सज्ज झाले आहे. या मालिकेसाठी हॅरी, रॉन आणि हर्मायनी या मुख्य पात्रांसाठी ओपन कास्टिंग कॉल जाहीर करण्यात आला होता, ज्याला तब्बल 30,000 हून अधिक अर्ज आले आहेत. या मालिकेत काही पात्रे साकारणाऱ्या कलाकारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. अल्बस डंबलडोर, सेव्हरस स्नेप, मिनर्व्हा मॅकगॉनगल आणि रुबिअस हॅग्रिड या लोकप्रिय पात्रांसाठी नवे चेहरे निवडण्यात आले आहेत. या घोषणेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. डंबलडोरची भूमिका आता ‘द क्राउन’ फेम जॉन लिथगो साकारणार आहेत, तर जेनेट मॅकटीर मॅकगॉनगलच्या रूपात दिसणार आहेत. पापा एसेइडू ‘गँग्स ऑफ लंडन’मधून प्रसिद्ध झाले असून, ते स्नेपच्या भूमिका साकारतील. ‘शॉन ऑफ द डेड’ फेम निक फ्रॉस्ट हॅग्रिडच्या रूपात झळकतील.

याशिवाय, लूक थॅलो क्विरिनस क्विरेल तर पॉल व्हाईटहाउस आर्गस फिल्चची भूमिका साकारणार आहेत. काही कलाकारांची नावे अपेक्षित होती, पण काहींच्या निवडींनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या मालिकेचे लेखन आणि कार्यकारी निर्मिती फ्रान्सिस्का गार्डिनर करणार आहेत. अनेक भागांचे दिग्दर्शन आणि निर्मिती मार्क मायलोड करणार असून, त्यांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले की, “इतक्या प्रतिभावान कलाकारांसोबत काम करणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. ते या पात्रांना कसे नव्या रूपात साकारणार हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.”

या प्रोजेक्टसाठी ब्रॉन्टे फिल्म अँड टीव्ही आणि वॉर्नर ब्रदर्स टेलिव्हिजन यांचा सहभाग आहे. जे.के. रोलिंग नील ब्लेअर, रुथ केनली-लेट्स आणि डेव्हिड हेमन हे सीरिजचे कार्यकारी निर्माते आहेत.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *