जुन्नरचा हापूस ‘शिवनेरी हापूस’ या नावाने ओळखला जाणार

 जुन्नरचा हापूस ‘शिवनेरी हापूस’  या नावाने ओळखला जाणार

पुणे, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जुन्नर तालुका, हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका असून इथे टोमँटो,भाजीपाला,कांदा, बटाटा,द्राक्षे,फळे ही पिके घेतली जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जुन्नर तालुका, हा राज्यातील पहिला पर्यटन तालुका असून इथे टोमँटो,भाजीपाला,कांदा, बटाटा,द्राक्षे,फळे ही पिके घेतली जातात.

काही दिवसांपासून या परिसरातील कृषीरत्न आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव चे कार्याध्यक्ष अनिल मेहेर तसेच कृषी विभागाकडे इथल्या शिवनेरी हापुसला भौगोलिक मानांकन मिळविण्याकरता प्रयत्न सुरु केले आणि त्याच्या या प्रयत्नला यशही मिळाले. इथल्या हापुसला हा रंजक असा इतिहासही आहे. जुन्नर तालुक्यात आब्यांची लागवड ही प्राचीन काळापासुन होत आहे. सातवाहन काळात जुन्नरमध्ये आंब्याची लागवड केली जात होती. तत्कालीन हा सातवाहनांची गाथासप्तशती या संदर्भ ग्रंथामध्ये प्राचीन जुन्नरमधील आंब्याची सविस्तर वर्णने आली आहेत.

निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या जुन्नरमधील महालाला आजही ‘हापूस बाग’ नावाने ओळखले जाते. जुन्नरचा हा आंबा इतर प्रस्थापितांपेक्षा वेगळा कसा है शास्त्रीयदृ‌ष्ट्या पटवून देण्याचे मोठे आव्हान अभ्यासकांसमोर होते. पुण्यातील आगरकर संशोधन संस्थेने शिवनेरी हापूसचे ‘डीएनए प्रोफायलिंग’ करून त्याचा वेगळेपणा सिद्ध केला, नारायणगावच्या ‘केहीके’चे कार्याध्यक्ष तात्या मेहेर यांच्या सहकायनि हिंगमिरे यांनी आंब्याचा सविस्तर प्रस्ताव तयार केला. त्यात शास्त्रीम, भौगोलिक तांत्रिक माहितीसह ऐतिहासिक संदर्भ पुराव्यांसह जोडण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज यांनाही आंब्याचे महत्व चांगलेच ज्ञात होते.आंब्याचे झाड टिकविणे किती आवश्यक आहे. यांचे ही उल्लेख आढळून आले आहेत. आंबा हे राष्ट्रीय फळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ला परिसरातील पिकणारा हा आंबा आता शिवनेरी हापूस नावाने प्रसिध्द होत आहे.भौगोलिक मानांकन मिळाल्याने आता हा शिवनेरी हापुस सातासमुद्रापार जाणार आणि यातुन इथल्या स्थानिक शेतक-यांची आर्थिक स्थर उंचावणार आहे.

देशातील कृषी क्षेत्रात सर्वाधिक ‘जीआय टॅग’ असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र आता पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहे.त्यामुळे राज्यातील नवनवीन प्रयोग करणा-या शेतक-यांना आता आपले उत्पादन निर्यात करण्याकरता ताठ मानेने या निर्यातक्षेत्रात उतरता येणार आहे.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *