देशातील सर्वात उंच महाकाय हनुमान मूर्तीला जलाभिषेक…

 देशातील सर्वात उंच महाकाय हनुमान मूर्तीला जलाभिषेक…

बुलडाणा, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान… एक मुखाने बोला… जय ….जय…. हनुमान… श्री रामचंद्र प्रभूचे परमभक्त असलेल्या हनुमंतराय यांचा आज जन्मदिवस…. चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी करण्याची परंपरा आहे. त्यानिमित्य बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथे 105 फूट उंच महाकाय हनुमानाची मुर्ती आहे .या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा सकाळीच बालाजी संस्थानच्यावतीने करण्यात आली.

हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे. नांदुरा येथील 105 फूट महाकाय हनुमंतरायाची ही मूर्ती देशातील सर्वात उंचीची असून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ही या मूर्तीची नोंद झालेली आहे .हनुमान जयंतीनिमित्त या मूर्तीला सकाळीच जलाभिषेक करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील हनुमान मंदिरामध्ये सकाळपासूनच भक्तांची दर्शनासाठी रिघ लागली आहे .

ML/ML/PGB 12 April 2025

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *