राष्ट्रीय ओबीसी कमिशनच्या अध्यक्षपदी हंसराज अहिर यांची नियुक्ती
चंद्रपूर, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर Former Union Minister of State for Home Hansraj Ahir यांची राष्ट्रीय इतर मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तशा आशयाचे पत्र जारी झाले आहे.
अहीर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून 4 वेळा खासदार होते. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराकडून त्यांचा पराभव झाला होता. सध्या हंसराज अहीर भाजपच्या ओबीसी आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. राज्यात ओबीसी आरक्षणाबाबत रणकंदन चालले असताना भाजपने हा मोठा निर्णय घेतला आहे.
नव्या नियुक्तीसाठी अहिर यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. हे एक घटनात्मक पद असून ओबीसी प्रवर्गाच्या सर्व जातींना नोकरी -शिक्षण व बढतीविषयक आरक्षणामध्ये अन्याय होऊ नये याबाबत आपण कार्यरत राहणार असल्याचे अहिर म्हणाले.Hansraj Ahir appointed as Chairman of National OBC Commission
सर्व समाजाच्या प्रगती सोबतच इतर मागासवर्गीयांची देखील प्रगती व्हावी व त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण तत्पर राहू असेही अहीर म्हणाले.
ML/KA/PGB
26 Nov .2022