मुंबई मराठी पत्रकार संघ राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२४ चे निकाल जाहीर ‘हंस’ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक

 मुंबई मराठी पत्रकार संघ राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धा २०२४ चे निकाल जाहीर ‘हंस’ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक

मुंबई, दि 2 :
मुंबई मराठी पत्रकार संघ आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २४ व्या राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.
२०२४ साठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एक लाख रुपये रकमेचा सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्काराचा मानकरी ‘हंस’ दिवाळी अंक ठरला आहे. अंतरीचे प्रतिबिंब आणि अक्षर हे अनुक्रमे द्वितीय व तृतीय पुरस्कार विजेते ठरले आहेत.
राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. अविनाश कोल्हे, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंडचे कार्यवाह अरूण भंडारे आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. स्पर्धेचे मुख्य समन्वयक म्हणून मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांनी तर रायगड जिल्ह्यातील दिवाळी अंक स्पर्धेचे समन्वयक म्हणून संघाचे ज्येष्ठ सदस्य दीपक म्हात्रे यांनी काम पाहिले.


राज्यस्तरीय निकाल पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक – हंस (प्रथम पारितोषिक, एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह)
अंतरीचे प्रतिबिंब (द्वितीय पारितोषिक)
अक्षर (तृतीय पारितोषिक)
सर्वोत्कृष्ट विशेषांक – नवभारत, दृश्य कला विशेषांक
मुलांसाठी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक – वयम, उत्तेजनार्थ – छावा
उत्कृष्ट दिवाळी अंक : कालनिर्णय
सर्वोत्कृष्ट कथा – सत्याग्रह, मिलिंद बोकील (दीपावली)
उत्कृष्ट कविता – आजकाल बायकाही…, लक्ष्मी यादव, पुरुष स्पंदन दिवाळी अंक
लक्षवेधी परिसंवाद : असहमतीचा आवाज / ऋतूरंग
लक्षवेधी मुलाखत : डॉ. सुनील लवटे यांची इंदुमती जोंधळे यांनी घेतलेली मुलाखत/ शब्दशिवार सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ : उत्तम अनुवाद
सर्वोत्कृष्ट व्यंगचित्रकार : प्रभाकर वाईरकर : शब्द रूची
सर्वोत्कृष्ट डिजिटल अंक : विवेक मेहेत्रे – ‘उद्वेली- ऑल दि बेस्ट २०२४’
याशिवाय, विशेष लेख : राजकारण की टोळीयुद्ध / विनय हर्डीकर, आर्याबाग दिवाळी अंक / अशी निवड परिक्षकांनी केली आहे.
रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक : इंद्रधनू (प्रथम पारितोषिक)
आगरी दर्पण (द्वितीय पारितोषिक)
शब्दसंवाद (तृतीय पारितोषिक)
उत्तेजनार्थ दिवाळी अंक : साहित्य आभा
उत्कृष्ट कथा : रेखा नाबर / जिथे कमी तिथे मी/ लोकसेवक दिवाळी अंक
उत्कृष्ट कविता : हितवर्धक दिवाळी अंक / कवी : गणपत म्हात्रे
उत्कृष्ट व्यंगचित्रकार : विवेक मेहेत्रे (साहित्य आभा)
लवकरच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी दिली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *