७ फेब्रुवारीला घाटकोपर येथे दिव्यांग तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा
मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :समर्थनम ट्रस्ट फॉर डिसेबल्ड या सामाजिक संस्थेतर्फे दिव्यांग आणि उपेक्षित तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा ७ फेब्रुवारी रोजी घाटकोपर येथील रामनिरंजन झुनझुनवाला कला व विज्ञान महाविद्यालयात सकाळी ९:३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पार पडणार आहे.
हा रोजगार मेळावा पूर्णतः मोफत असून, कुठलेही शुल्क आकारले जाणार नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग आणि उपेक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी अधिकाधिक उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा उद्देश आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे महाराष्ट्र राज्य क्षेत्र अधिकारी जितेंद्र कर्णिक व मानसी माहुकर यांनी केले .
यावेळी ऋषिकेश पवार,आमरीन शेख, शिवशंकर शेख,तेजल हांडे,आदी उपस्थित होते.
समर्थनम ट्रस्टचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. महांतेश जी.के.,
यांच्या नेतृत्वाखाली १९९७ पासून कार्यरत असलेल्या समर्थनम ट्रस्टने नवी मुंबई येथे दिव्यांगांसाठी दर्जेदार शिक्षण, निवास, पौष्टिक आहार, व्यावसायिक प्रशिक्षण आणि रोजगार पुनर्वसन यावर विशेष भर दिला आहे. संस्थेने गेल्या २७ वर्षात १५० पेक्षा अधिक जॉब फेअरचे आयोजन केले असून १५ हजार पेक्षा अधिक दिव्यांग तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. २०३० पर्यंत १० लाख दिव्यांग आणि उपेक्षित तरुणांना सक्षम करण्याचा संकल्प आहे.
या मेळाव्यात १० वी पास ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शैक्षणिक पात्रता असलेले ३५० हून अधिक उमेदवार सहभागी होतील, अशी आयोजकांची अपेक्षा आहे. यामध्ये खाजगी क्षेत्रातील विविध नामांकित २५ पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत.
या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी 6364867811 / 6364857807 या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन जितेंद्र कर्णिक व मानसी माहुकर
ML/ML/PGB
3 Feb 2025