स्मशानभूमीत अतिक्रमण वाद, अंत्यविधीवेळी दोन गटांत हाणामारी…

गडचिरोली दि १५:– गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील स्मशानभूमीवर अतिक्रमणाच्या वादातून अंत्यविधीच्या वेळीच हाणामारीची धग पेटली. नागेपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील आरक्षित स्मशानभूमीत मृत झालेल्या गुरूनुले कुटुंबीय अंत्यसंस्कार करत असताना डुक्करपालकांचा गट तिथे आला. त्यांच्यात वाद वाढत गेला आणि पाहता पाहता दोन्ही गटांत तुफान मारामारी झाली. सात ते आठ जण जखमी झाले असून दोन्ही बाजूंनी अहेरी पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. त्यात डुक्करपालक गटातील दोन जणांवर खुनाचा प्रयत्न असा गंभीर गुन्हा दाखल झाला आहे.ML/ML/MS