इस्त्राईल लष्कराच्या हल्ल्यात हमास प्रमुख याह्या सिनवर ठार, नेत्यानाहू यांनी केली घोषणा

इस्राईलविरोधात युद्ध पुकारणारा आणि गेल्यावर्षी ७ ऑक्टोबर रोजी इस्राईलवर क्षेपणास्त्र डागणाऱ्या पॅलेस्टाईनच्या हमास या बंडखोर गटाचा प्रमुख आणि मास्टरमाईंड याह्या सिनवर ठार झाला आहे. इस्त्राईल लष्कराने केलेल्या हल्ल्यात त्याला ठार केल्याची घोषणा इस्राईचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी केली आहे. ज्या इस्राईलच्या नागरिकांना हमासच्या बंडखोरांनी बंदी करुन ठेवलं आहे, त्यांच्या नातेवाईकांपर्यंत हमासचा प्रमुख मारल्या गेल्याची बातमी पोहोचवा, असे आदेशही नेत्यानाहू यांनी दिलेत.