सोन्याच्या दागिन्यांवर आता हॉ़लमार्क अनिवार्य
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोने खरेदीमधील ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी सरकारने आता सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना आजपासून सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.
नवीन आर्थिक वर्षात तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आजपासून, सोने खरेदी करतात ग्राहकांना नवीन नियमांचे पालन करावे लागेल.
केंद्र सरकारने सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीच्या नियमांमध्ये बदल करताना आजपासून सोन्याच्या दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे. 1 एप्रिल 2023 पासून कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांवर 6-अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असणे आवश्यक आहे.
मार्चमध्ये माहिती देताना भारतीय मानक ब्युरो (BIS) ने म्हटले होते की, नवीन आर्थिक वर्षात कोणताही दुकानदार 6 अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) शिवाय सोन्याचे दागिने विकू शकणार नाही.
SL/KA/SL
1 April 2023