हॉल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी, निरीत नवी दालने
नागपूर, दि .२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यार्थ्यांना वैज्ञानिक जग आणि अंतराळाची सफर घडविणाऱ्या नागपुरातील रामन विज्ञान केंद्र व तारामंडळात हॉल ऑफ ऑगमेंटेड रियालिटी या नव्या दालनाची भर पडली असून या नव्या गॅलरीचे उद्घाटन राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (नीरी) चे संचालक डॉ. अतुल वैद्य आणि अनु खनिज अन्वेषण आणि संशोधन संचालनालय नागपूरचे माजी प्रादेशिक संचालक डॉ. अमित मजुमदार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळेला धरमपेठ सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अखिलेश पेशवे, न्यू अपोस्टोलीक इंग्लिश हायस्कूलच्या प्राचार्या विनिता बोवर, रामन विज्ञान केंद्राचे प्रकल्प समन्वयक अर्णब चॅटर्जी उपस्थित होते. नवतंत्रज्ञानाच्या या युगात आभासी माध्यमांनी आपल्या कल्पनांना खरे रूप दिले आहे तुम्ही असता आपल्या ठिकाणी पण वाटेल की तुम्ही समुद्राजवळ उभे आहात आणि पेंग्विन, मोठे व्हेल मासे, पांढरे अस्वल तुमच्या आसपास खेळत आहे.
अशा या आभासी दुनियेची सफर नागपुरातील रामन विज्ञान केंद्रात सुरू करण्यात आलेली आहे. हे दालन अभ्यंगताना नवीन तंत्रज्ञानाची परस्पर संवादी पद्धतीने ओळख करून देते. येथे वास्तविक जग आणि संगणक निर्मित जगाचे मिश्रण आबालवृद्ध यांना भुरळ घालते. बच्चे कंपनी यांनी देखील मोठी मजा केली.
SL/KA/SL
29 April 2023