हळदीचा हंगाम अंतिम टप्प्यात , हळद काढणीला वेग
वाशीम दि १३:– वाशीम जिल्ह्यात सध्या हळद काढणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, शेतकरी मोठ्या प्रमाणावर हळद काढणीच्या कामात व्यस्त आहेत. मागील चार-पाच वर्षांपासून जिल्ह्यात हळदीचे उत्पादन वाढले असून, नगदी पीक म्हणून हळदीला विशेष महत्त्व मिळत आहे.सुरुवातीला ट्रॅक्टरच्या सहाय्याने हळद जमिनीतून उपटली जाते. त्यानंतर मजुरांच्या हाताने हळद वेचणी केली जात आहे. वर्षागणिक जिल्ह्यात हळद उत्पादक शेतकऱ्यांची संख्या वाढत असून, अनेक शेतकरी पारंपरिक पिकांऐवजी हळद लागवडीला प्राधान्य देत आहेत. यामुळे जिल्हा हळद उत्पादनात पुढे येत असल्याचे चित्र दिसत आहे.