“हाजी अरफात शेख यांच्या नेतृत्वात मुंब्र्यात परिवर्तनाची लाट – भाजपमध्ये मुस्लिम समाजाचा मोठा प्रवेश
ठाणे, 13 :
ठाणे महानगरपालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर मुंब्र्यात आयोजित महायुतीच्या प्रचारसभेत महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष हाजी अरफात शेख यांच्या दमदार भाषणामुळे राजकीय वातावरण तापले असून शिवसेना, भाजपा महायुतीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येणार असा विश्वास स्थानिक जनतेने व्यक्त केला. हाजी अल्फा शेख यांची समाजामध्ये एक फार मोठी प्रतिमा असून त्यांनी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपले कार्य तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवलेले आहे. तसेच त्यांचा नागरिकांशी असलेला रोजचा जनसंपर्क देखील या निवडणुकीत उपयोगी येईल.
या सभेत भाजप ठाणे शहराचे माजी उपाध्यक्ष माननीय अनिल भगत,
प्रभाग क्रमांक 31 च्या उमेदवार ॲड. अनुसया अनिल भगत,
प्रभाग क्रमांक 33 चे उमेदवार सुजित गुप्ता, नाझिया तांबोळी, सोहेल सय्यद व आतिया शेख यांचा भव्य प्रचार करण्यात आला.
हाजी अरफात शेख यांनी आपल्या भाषणात मुंब्रा शहराच्या दयनीय अवस्थेसाठी आमदार जितेंद्र आव्हाड आणि बाहेरून येऊन राजकारण करणाऱ्या नजीब मुल्ला यांना थेट जबाबदार धरले. तसेच “हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघांनी मुंब्र्याला लुटले असून विकास शून्य केला
अशा शब्दांत त्यांनी जनतेचा रोष व्यक्त केला.
मुंब्र्यात नशा, बेरोजगारी, अस्वच्छता, पाण्याची समस्या, गटार, रस्ते व युवकांचे भविष्य अंधारात असल्याचे सांगत त्यांनी “नशामुक्त, स्वच्छ आणि रोजगारयुक्त मुंब्रा” हे महायुतीचे ध्येय मांडले. “राज्य सरकारच्या सर्व योजना, युवकांसाठी रोजगार केंद्र, महिला सक्षमीकरण, अल्पसंख्याक विकास निधी – हे सगळं तुमच्या भागात आणायचं असेल तर भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार निवडून द्यावे लागतील,”
असे स्पष्ट आवाहन त्यांनी केले.
भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश
हाजी अरफात शेख यांच्या भाषणशैली, प्रामाणिकपणा व मुस्लिम समाजातील विश्वासामुळे या सभेत समाजसेविका सभा मोहम्मद यांच्यासह अनेक युवक, महिला व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
सभा मोहम्मद म्हणाल्या की “हाजी अरफात शेख साहेब जे सांगतात ते करून दाखवतात. अनेक वर्ष आम्ही त्यांचे सामाजिक कार्य पाहत आहोत. त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे म्हणून आज आम्ही भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या सभेमुळे मुंब्र्यात मुस्लिम युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
“आपणही सरकारमध्ये आहोत, आपल्यालाही न्याय मिळू शकतो” हा विश्वास या सभेतून समाजात निर्माण झाला.
सभेच्या शेवटी “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्” च्या घोषणांनी संपूर्ण सभागृह दणाणून गेले.KK/ML/MS