परळ हाफकिन येथे कामगार शिक्षक दीन जल्लोषात साजरा.

मुंबई, दि १८
परळ येथील हाफकिन बायोफार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि., या कंपनीत १६ सप्टेंबर हा ६८ वा कामगार शिक्षण दिन दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास मंडळ (कामगार व रोजगार मंत्रालय, भारत सरकार), प्रादेशिक संचालनालय, मुंबई, हाफकिन बायोफार्मास्यूटिकल कॉपोरेशन लि. आणि त्यांच्या कर्मचारी संघटनेच्या सहकार्याने जल्लोषात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे उदघाटन हाफकिन कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक सुनील महिंद्रकर, (आयएएस) यांच्य हस्ते झाले. आपल्या भाषणात त्यांनी मंडळ देशभरातील ५० प्रादेशिक संचालनालयांतून कामगार शिक्षण दिन साजरा करत असल्याचे सांगितले. तसेच हाफकिन कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांच्या सबलीकरणासाठी कामगार शिक्षणाची भूमिका फार महत्त्वाची आहे. केंद्रीय कामगार शिक्षण मंडळाचे शिक्षण अधिकारी चंद्रसेन जगताप यांनी विविध उपक्रमांची माहिती देताना नेशन फर्स्ट या दृष्टिकोनातून मंडळ कार्यरत असून स्व-विकास, समाजविकास व संस्था-विकास या क्षेत्रांत मंडळाचे कार्य महत्त्वाचे आहे. कामगार शिक्षण योजनेमुळे संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना मोठ्या प्रमाणावर लाभझाल्याचेही त्यांनी सांगितले. हाफकिन संस्थेचे प्रमुख कामगार व मनुष्यबळ विकास अधिकारी डॉ. अमित डोंगरे यांनी कामगार शिक्षण योजनेचे कौतुक केले. नेतृत्व विकास व संघटनात्मक कार्यप्रणाली मजबूत करण्यात या योजनेचे योगदान फार मौल्यवान आहे. तसेच या माध्यमातून व्यवस्थापनाला कामगार कल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात मदत होत आहे. हाफकिन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस दीपक पेडणेकर आणि नितीन तिरलोटकर यांनी आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, कामगार शिक्षणामुळे कार्यक्षेत्रात तसेच कर्मचारी-व्यवस्थापन नातेसंबंधांत सकारात्मक बदल घडून येत आहेत. या कार्यक्रमात कामगार शिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि हाफकिन संस्थेचे कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन त्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. याप्रसंगी कामगार शिक्षण योजनेतील योगदानाबद्दल रमेश भुजबळराव यांना विशेष सन्मानित करण्यात आले.KK/ML/MS