उंच टॉवरच्या खोदकामामुळे गिरगावातल्या जुन्या चाळी इमारतींना बसतायेत हादरे

 उंच टॉवरच्या खोदकामामुळे गिरगावातल्या जुन्या चाळी इमारतींना बसतायेत हादरे

मुंबई, 23 : गिरगावतील जगन्नाथ शंकर शेठ मार्गावरचा झावबावाडीतल्या जुन्या चाळी इमारतींचा समूहा पुनर्विकासाचे काम सध्या जोमाने सुरू झाले आहे .६५ मजल्याचे दोन उतुंग टॉवर उभारण्यासाठी एका बाजूंच्या २०,२२ रहिवासी इमारती जमीन दोस्त करून मोकळ्या जागेत ७,८ मोट मोठ्या मशीन आणून जमिनीचा पाया खोदण्यासाठी आणि पिलर उभारण्यासाठी पोकलेन मशीने मोठ मोठे खडे पाडून खोदकाम सुरू करण्यात आले आहे.परंतु पोकलेनच्या आवाजामुळे आणि खोदकामामुळे आजूबाजूच्या जुन्या चाळी इमारतीं कंपन निर्माण होऊन चांगलेच हादरे बसू लागले आहेत त्यामुळे रहिवासी इमारतींना धोका निर्माण झाला आहे. तसेच या ठिकाणी असणारे जाबवाडी उद्यान देखील या विकासाने महापालिकेची परवानगी नसताना गायब केले आहे.

पाया खोदण्यासाठी सकाळी सहा वाजल्यापासून पोकलेन मशीने खडे मारायला सुरुवात केली जाते. यामुळे लहान मुले वयस्क नागरिकांची महिला वर्गाची अनेकवेळा झोपमोड होते असते . मशीनचा दणक्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील जुन्या चाळी इमारतींना अक्षरशः हादरे बसत आहेत. घरातल्या जड अवजड वस्तू देखील वरतून खाली पडून नुकसान होत आहे. पोकलेन च्या आवाजाने कुंड्यांमधील झाडेझुडपे भूकंप आल्यासारखी थरथर कापत असतात. ह्या विषय स्थानिकांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासह हाकेच्या अंतरावर असलेल्या सी विभाग जवळच्या म्हाडा कार्यालय आणि पालिका कार्यालयात तक्रारी केल्या आहेत.

रहिवाश्यांनी तक्रार केल्यावर पालिका सी विभागाचे दुय्यम अभियंता नवनीत जाधव गेल्या आठवड्यापासून माणस पाठवून पाहणी करतो असे कारणे देऊन सरकारी काम टाळून जनतेच्या तक्रारी विसरून गेले आहेत तर सी २ विभाग चंदनवाडी म्हाडा कार्यालयाच्या डेप्युटी इंजिनियर वैष्णवी कवाळे ह्यांनी बिल्डर आर्किटेक्टला नोटीस पाठवल्याचे म्हटल आहे. पण कारवाई करण्याचे काम वरिष्ठ आणि पालिका इमारत शहर विभागा अधिकाऱ्यांच्या हातात असल्याच सांगून स्वतःला या प्रकरणातून नामा निराळे केले आहे.

त्रस्त रहिवाशी निना लाड यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी पहाटेपासून सुरू होणाऱ्या खोदकामामुळे आणि पोकलेन च्या दणक्यामुळे आमच्या इमारतीला हादरे बसत असल्याच सांगितलं आहे. त्याचबरोबर घरातील जड अवजड वस्तू डोक्यावर अंग खांद्यावर पडून नुकसान होत आहे. आमची चाळ शंभर वर्ष जुनी असून टॉवरच्या खोदकामामुळे आणि इमारतीला बसत असणाऱ्या हदऱ्यांमुळे आमच्या रहिवाश्यासह चाळीला धोका निर्माण झाल्याचे म्हटल आहे. एखादी दुर्घटना घडलीस तर त्याला सदर विकासक , पालिका ,अधिकारी आणि म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार असल्याच त्यांनी सांगितले आहे.

लक्ष्मी नारायण इमारत क्र. 16-A, 8, C, येथील भाडेकरूंनी यापूर्वी आपल्या कार्यालयाकडे झावबावाडी परिसरात सुरू असलेत्या बॉंधकामामुळे इमारतीस तीव्र कंपने , भि्तींना तडे जाणे व संरचनामक सुर्क्षिते बाबत गंभीर धोका निर्माण झाल्याबाबत पालिका आयुक्त आणि म्हाडा कार्यालयात तक्रार सादर कैलेली आहे. सदर तक्रारीच्या अनुषंगाने घर मालक या नात्याने आम्ही प्रथमच हे पत्र सादरकरत असून, संबंधित तक्रारीची गंभीरता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करणे अत्यंत आवश्यक असत्याचे आमचे ठाम मत आहे.अशा परिस्थितीत कोणतीही गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही असे अर्जात चाळ मालकाने अर्जात लिहिले आहे.

या गंभीर विषय बाबत पुनर्विकासाचे काम पाहणारे साईट सुपरवायझर कुणाल कोळंबकर यांना स्थानिकांच्या तक्रारी विषयी विचारणा केली असता त्यांनी मी तुम्हाला या बाबत काही सांगू शकत नाही साइटवर सलीम म्हणून ठेकेदार आहेत. ते तुम्हाला सगळ सांगू शकतात मी फक्त परवानगयांची काम पाहतो .मग पोकलेन मशीने हॅमरिंग करण्यास परवानगी आहे का ? असे विचारले असता त्यांनी मी आमच्या वरिष्ठ म्हणजेच बॉस बरोबर बोलून घेतो असे कारण पुढे केले. खोदकामामुळे आजूबाजूच्या चाळी इमारतींना धोका असल्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यावर कोळंबकर यांनी मी पाहतो असे उत्तर देऊन काहीच माहिती नसल्यासारखा आव आणला.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *