अमेरिकेत सुरु झाली AI Trainer असणारी जिम

डलास, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : AI ने आता हळूहळू आपल्या आयुष्यातील सर्व क्षेत्रांचा ताबा घ्यालया सुरुवात केली आहे. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून प्रत्येक फिटनेस प्रेमीच्या मनगटावर स्थानापन्न झालेल्या हे AI आता चक्क Gym Trainer म्हणून काम करू लागले आहे. मात्र तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार,AI द्वारे चांगले प्रोग्राम तयार केल्यास लोकांच्या व्यायामात मदत होऊ शकेल. मात्र, आरोग्य आणि फिटनेस ट्रेनिंगसाठी भावनात्मक बुद्धीमत्ताही आवश्यक असते. AI याचा पर्याय होऊ शकत नाही. मात्र तरिही ही AI Trainer Gym कशी चालते याबाबत लोकांमध्ये उत्सुकता आहे,

अमेरिकेच्या डलास, टेक्सासमध्ये ल्यूमिन फिटनेस नावाचे असे पहिले जिम उघडण्यात आले आहे,जिथे एआय ट्रेनरसोबत तुम्ही व्यायाम करू शकता. एवढेच नव्हे तर एआय वर्कआऊटदरम्यान केलेल्या हालचालीवर बोलून आपला फीडबॅक देऊ शकेल. जिमच्या भिंतीवर एलईडी स्क्रीन लावला आहे. या स्क्रीनच्या माध्यमातून एआय पर्सनल ट्रेनर एकाच वेळी १४ लोकांना प्रशिक्षित करू शकेल. प्रत्येक व्यक्तीचे अापले एक स्टेशन असते.

स्क्रीनच्या मागे लागलेला सेन्सर व्यक्तीचा व्यायाम आणि विशेष पद्धतीने तयार केलेले उपकरण उदा. डंबल, स्किपिंग रोप आदी ट्रॅक करतात. दुसरीकडे, व्यायाम करताना हेडफोनवर एआय आपले आकलन आणि निर्देश देत राहील. ल्यूमिन फिटनेसचे सीईओ ब्रँडन बीन म्हणाले, जिममध्ये लावलेले सेन्सर प्रत्येक सदस्यावर देखरेख ठेवून फीडबॅक देऊ शकेल. मानव प्रशिक्षकही प्रतिभेचा पर्याय शोधत नाहीत. याउलट, आम्ही त्यांना चांगला अनुभव देण्यासाठी उपकरण प्रदान करत आहोत. एआयचे खास वैशिष्ट्य त्याच्या शिकण्याची क्षमता आहे.

SL/KA/SL

6 Jan. 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *