गुटखा विक्री साठी मोक्का आणि भिवंडीत विशेष मोहीम
नागपूर दि ९ : राज्यातील शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात पान , तंबाखू , अंमली पदार्थ पदार्थ मिळण्याच्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, वारंवार असे गुन्हे करणाऱ्यांवर कायद्यात बदल करून अशा लोकांवर मोक्का लावण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात दिली. याशिवाय भिवंडीत याबाबत एक विशेष मोहीम राबविण्यात येईल असेही ते म्हणाले.
गुटखा विक्री करणाऱ्यांवर मोक्का लावण्यासाठी कायद्यात अडचणी होत्या, मात्र आता त्यात बदल करून मोक्का लावण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. अशी दुकाने , पान टपऱ्या शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात असतील तर ती उध्वस्त करण्याच्या सूचना सर्व महापालिका, नगरपालिकांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याआधी दिली, याबाबतचा प्रश्न प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित केला होता. त्यावर अभिमन्यू पवार, अस्लम शेख यांनी उपप्रश्न विचारले होते.ML/ML/MS