एडीएम आणि बायर यांची अन्न मूल्य साखळीतील भागीदारी अधिक मजबूत,
महाराष्ट्रातील १ लाख सोयाबीन शेतकऱ्यांपर्यंत उपक्रम विस्तारणार

 एडीएम आणि बायर यांची अन्न मूल्य साखळीतील भागीदारी अधिक मजबूत,महाराष्ट्रातील १ लाख सोयाबीन शेतकऱ्यांपर्यंत उपक्रम विस्तारणार

गुरुग्राम, दि ५:
एडीएम (NYSE: ADM) आणि बायर यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पाठबळ देण्यासाठी त्यांच्या अन्न मूल्य साखळी (Food Value Chain) भागीदारीला पुढील तीन वर्षांसाठी मुदतवाढ दिल्याची घोषणा केली आहे. ही भागीदारी प्रथम २०२२ मध्ये सुरू करण्यात आली असून याला प्रचंड यश मिळाले आहे. नव्या विस्तारामुळे हा उपक्रम शेतकरी उत्पादक संघटनांच्या (FPOs) माध्यमातून २५,००० वरून १,००,००० शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे.
या भागीदारीअंतर्गत सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र ३५,००० हेक्टरवरून २,००,००० हेक्टरपर्यंत वाढवण्यात येणार असून, कार्यक्षेत्राचा विस्तार लातूर, धाराशिव (पूर्वीचे उस्मानाबाद) आणि बीड या जिल्ह्यांबरोबरच नांदेड, परभणी, हिंगोली आणि सोलापूर या सात जिल्ह्यांपर्यंत करण्यात येणार आहे.
भागीदारीची प्रमुख उद्दिष्टे :
• पुढील तीन वर्षांत FPOs च्या माध्यमातून शेतकऱ्यांची व्याप्ती २५,००० वरून १,००,००० पर्यंत वाढवणे
• सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र ३५,००० हेक्टरवरून २,००,००० हेक्टरपर्यंत वाढवणे
• महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये उपक्रमाचा विस्तार

ही भागीदारी ProTerra Foundation च्या शाश्वतता चौकटीवर आधारित असून पुरवठा साखळीतील पाच महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करते —
उत्पादन व्यवस्थापन (Production), जैवविविधता व पीक संरक्षण (Protection), कार्यक्रम निरीक्षण (Programme Monitoring), सविस्तर पीक व्यवस्थापन नोंद (Passport) आणि काढणीपश्चात कीड व्यवस्थापन (Post-harvest Management).

या उपक्रमांतर्गत बायरकडून Good Agricultural Practices (GAP), जैवविविधता आणि शाश्वत शेती पद्धतींवर प्रत्यक्ष व डिजिटल प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जात आहेत. मॉडेल प्रात्यक्षिक प्लॉट्स, मोठ्या प्रमाणावरील शेतकरी मेळावे आणि ऑडिओ ब्रिज कॉल्सच्या माध्यमातून ५८,००० हून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. तसेच IPM (Integrated Pest Management) आधारित पीक व्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. प्रकल्प चालू असलेल्या जिल्ह्यांमध्ये, बायरने अनेक पूर्व-पेरणी आणि पेरणीनंतर पीक-व्यवस्थापन शिबिरेदेखील आयोजित केली आहेत. निवडक शेतकरी गटाने जागतिक स्तरावर बेंचमार्क (Standard) शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करण्यासाठी बे गॅप प्रशिक्षण घेतले आहे.

एडीएमच्या क्लस्टर अ‍ॅग्रोनॉमिस्ट टीमला पोषण व्यवस्थापन, कीडनाशक वापर नियोजन आणि GAP संदर्भातील नियमित प्रशिक्षण दिले जात असून, यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत शेती पद्धती प्रभावीपणे राबवण्यासाठी मार्गदर्शन मिळत आहे.

या उपक्रमामार्फत ADM ने भारतातील आपल्या व्यापक कार्यजाळ्याचा प्रभावी उपयोग केला असून, त्यामध्ये उगमस्तर (origination), तेलबिया प्रक्रिया, कमोडिटी ट्रेडिंग तसेच मानवी व पशुखाद्य पोषण या क्षेत्रांचा समावेश आहे. या सर्वांच्या माध्यमातून शेतकरी समुदायांना अधिक सक्षम पाठबळ देण्यात येत आहे.
याअंतर्गत ADM कृषी विज्ञान केंद्रांद्वारे प्रत्यक्ष शेतस्तरावर सहभाग वाढवण्यात आला असून, देशभरातील ५० हून अधिक पीक विकास व खरेदी केंद्रांमार्फत शेतकऱ्यांशी सातत्यपूर्ण संवाद आणि सहकार्य साधले जात आहे. या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेती पद्धती, बाजारपेठेची जोड आणि शाश्वत उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होत आहेत.
या भागीदारीबाबत बोलताना अमरेन्द्र मिश्रा, मॅनेजिंग डायरेक्टर – Ag Services & Oilseeds आणि कंट्री मॅनेजर, भारत, ADM म्हणाले,
“बायरसोबतची आमची विस्तारित भागीदारी ही दीर्घकालीन दृष्टीकोनाचे प्रतिबिंब आहे. ADM च्या बाजारपेठीय जोडणी व जागतिक संसाधनांचा उपयोग करून आम्ही १ लाख शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य, शाश्वत उपजीविका आणि पर्यावरणपूरक शेतीकडे नेण्यासाठी सक्षम करू.”

सायमन विबुश, कंट्री डिव्हिजनल हेड – क्रॉप सायन्स, बायर (भारत, बांगलादेश व श्रीलंका) म्हणाले,
“शाश्वत शेती ही एकट्याने साध्य होणारी प्रक्रिया नाही. ADM सोबतची भागीदारी शेतकरी समृद्धी, हवामान-सुसंगत शेती आणि जबाबदार संसाधन व्यवस्थापनासाठी आमची सामूहिक बांधिलकी दर्शवते. या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे उत्पादन शाश्वत पद्धतीने वाढेल आणि भविष्यासाठी सक्षम कृषी परिसंस्था निर्माण होईल.”

एडीएमबाबत
ADM ही जागतिक स्तरावरील अग्रगण्य कृषी व अन्न पुरवठा साखळी व्यवस्थापन कंपनी असून, निसर्गाच्या माध्यमातून जीवनमान समृद्ध करण्यासाठी कार्यरत आहे. अन्नसुरक्षा, पोषण, आरोग्य व शाश्वततेच्या क्षेत्रात ADM नावीन्यपूर्ण उपाय प्रदान करते. ADM स्थानिक गरजांना जागतिक क्षमतांशी जोडून अन्न सुरक्षेत योगदान देते.
ADM बद्दल अधिक माहिती www.adm.com वर जाणून घ्या.

बायरबाबत
बायर ही आरोग्यसेवा व कृषी क्षेत्रातील जागतिक आघाडीची कंपनी असून “Health for all, Hunger for none” या ध्येयाने कार्यरत आहे. शाश्वत विकास, नवकल्पना आणि विश्वासार्हतेसाठी बायर ओळखली जाते. बायर शाश्वत विकास घडवून आणण्यास आणि आपल्या व्यवसायातून सकारात्मक परिणाम निर्माण करण्यास वचनबद्ध आहे. बायर ब्रँड जगभरात विश्वास आणि गुणवत्तेचे प्रतीक आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये या ग्रुपने सुमारे ९३,००० लोकांना रोजगार दिला आणि त्यांची विक्री ४६.६ अब्ज युरो होती. संशोधन आणि विकास खर्च ६.२ अब्ज युरो इतका होता. अधिक माहितीसाठी www.bayer.com येथे भेट देता येईल.KK/ML/MS

Milind

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *