मिरा रोड येथे गुरूपौर्णिमा जल्लोषात

मुंबई प्रतिनिधी, दि. १२ : गुरूपौर्णिमा उत्सव निमित्त श्री स्वामी समर्थ मठ श्री साई गजानन महाराज मंदिर मिरा गाव मिरारोड पुर्व येथे भव्य दिव्य पालखी मिरवणूक व गुरूपौर्णिमा उत्सव प्रचंड अफाट अलोट गर्दीत भक्तांच्या अद्भुतरम्य उत्सवात पार पडला,भजन, ढोल ताशा वादकां सह स्वामी समर्थ महाराज ची मिरा गाव परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली मिरा गावात गावकऱ्यांनी घरा घरात पालखी चे पुजण केले, व महाआरती व दर्शनासाठी अलोट गर्दी भक्तांनी केली. संपूर्ण मिरा रोड स्वामी मय झाला होता, भावीकानी शिस्तप्रिय स्वामी चे रांगेत दर्शन घेतले, महाप्रसाद अप्रतिम चवदार दाल खिचडी व लाळू , केळी, प्रसादाचा वाटप करण्यात आला, पहिल्यांदाच स्वामी समर्थ महाराज मठ मिरा रोड ला स्थापन झाल्यानं सर्व भक्तांच्या अद्भुतरम्य उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते, स्वामी समर्थ महाराज चार मठ मिरारोड मध्ये स्वामी समर्थांच्या भक्तांच्या कल्याणासाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वासही अनेक भक्तांनी व्यक्त केला, आठ हजार पेक्षा जास्त भक्तांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला मिरवणूक मध्ये स्थानिक शिवसेना जिल्हाप्रमुख नगरसेवक श्री राजु भोईर , नगरसेवक मोहन म्हात्रे, सौ भावना भोईर, सौ सुरेखा सोनार, मनसे अध्यक्ष संदीप राणे तसेच विश्व हिंदू परिषदेचे व बजरंग दलाचे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते, गुरूपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मठाचे अध्यक्ष श्री गजानन धागे व स्वामी समर्थ भक्त परिवार श्रीरंग परब, संजय सावंत, स्वप्नाती जेठे, अवधुत उमरोतकर, डॉ सुप्रिया गजरे, रवी कोलंबेकर, प्रमोद गाजरे , सुदेश भोवर, नितीन पवार, धोंडीराम अस्वले, वेंकटेश बदिपल्ली, इत्यादी अनेक सेवकांनी परिश्रम घेऊन उत्सव पार पडला. मठाचे अध्यक्ष श्री गजानन नागे यांनी हा मठ श्री रामनवमी ला स्थापन केला होता.