गुजरात टायटन्सचे मालक बदलले, टोरंट ग्रुपचीही सहमालकी

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 वा हंगाम येत्या चार दिवसात म्हणजेच 22 मार्च पासून सुरू होणार आहे. या हंगामापूर्वी मेगा ऑक्शन घेण्यात आले. त्यामुळे प्रत्येक संघातच मोठे बदल झाले आहे. महत्वाचं म्हणजे गुजरात टायटन्सचे मालकच बदलले आहेत. टोरंट ग्रुपने गुजरात टायटन्सचे 67 टक्के हिस्सा खरेदी केला आहे. या करारासाठी बीसीसीआयकडून मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे आयपीएल 2025 मध्ये गुजरातचे नवे सहमालक म्हणून टोरंट ग्रुप दिसणार आहे.