गुजरात विमान अपघात पक्षांच्या धडकेने, प्रवाशांसोबतच वैद्यकीय विद्यार्थी मृत्युमुखी

अहमदाबाद, दि. १२ : अहमदाबादहून लंडन गॅटविकला जाणारे विमान AI171 आज टेक ऑफनंतर अपघातात झाल्याची घटनेचे तपशील एअर इंडियाने माध्यमांसमोर मांडले आहेत. या अपघातात विमानातील २४२ पैकी २४१ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादमध्ये ज्या इमारतीवर एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान कोसळले होते, त्या इमारतीत अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटलचे इंटर्न डॉक्टर राहत होते. हे इंटर्न डॉक्टरांचे वसतिगृह होते. विमान कोसळले तेव्हा तिथे ५० ते ६० इंटर्न डॉक्टर होते. या अपघातात अनेक वैद्यकीय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. हा भीषण अपघात पक्ष्यांच्या धडकेमुळे झाल्याची शक्यता DGCA ने व्यक्त केली आहे.
AIR India ने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबादहून दुपारी १.३८ वाजता निघालेल्या या विमानात २४२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. त्यापैकी १६९ भारतीय नागरिक, ५३ ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन नागरिक आणि ७ पोर्तुगीज नागरिक आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात येत आहे. अधिक माहिती देण्यासाठी Air India ने १८०० ५६९१ ४४४ हा एक विशेष प्रवासी हॉटलाइन क्रमांक दिला आहे. या घटनेची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना एअर इंडिया पूर्ण सहकार्य करत आहे. दोन्ही इंजिनमध्ये पक्षी आदळल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज DGCA ने आपल्या निवेदनात व्यक्त केला आहे. एअर इंडिया त्यांच्या X हँडल (x.com/airindia) आणि airindia.com वर नियमित अपडेट्सद्वारे पुढील माहिती जाहीर करेल.
एअर इंडियाने मीडिया प्रतिनिधींना समर्पित प्रवासी हॉटलाइन क्रमांकावर कॉल न करण्याची विनंती केली आहे. कोणत्याही मीडियाशी संबंधित प्रश्नांसाठी, ते एअर इंडियाच्या मीडिया संपर्काशी संपर्क साधू शकतात: +91 9821414954 असे आवाहन केले आहे.
अहमदाबाद अपघाताबाबत DGCA चे निवेदन
१२ जून २०२५ रोजी, मेसर्स एअर इंडिया बी७८७ विमान व्हीटी-एएनबी अहमदाबादहून गॅटविकला जाताना एआय-१७१ उड्डाण करत असताना अहमदाबादहून उड्डाण केल्यानंतर लगेचच कोसळले. विमानात २४२ जण होते ज्यात २ पायलट आणि १० केबिन क्रू होते. हे विमान कॅप्टन सुमित सभरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांच्या नेतृत्वाखाली होते. कॅप्टन सुमित सभरवाल हे एलटीसी आहेत ज्यांना ८२०० तासांचा अनुभव आहे. सह-वैमानिकाला ११०० तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.
ATS नुसार, विमानाने अहमदाबादहून धावपट्टी २३ वरून १३३९ भारतीय वेळेनुसार (०८०९ यूटीसी) उड्डाण केले. एटीसीला मेडे कॉल देण्यात आला, परंतु त्यानंतर एटीसीने केलेल्या कॉलला विमानाने कोणताही प्रतिसाद दिला नाही. रनवे २३ वरून निघाल्यानंतर लगेचच विमान विमानतळाच्या बाहेर जमिनीवर कोसळले. अपघातस्थळावरून प्रचंड काळा धूर येताना दिसला.
मेघानी नगरमधील बीजे मेडिकल कॉलेजच्या यूजी हॉस्टेलच्या मेसवर विमान थेट कोसळले. अनेक एमबीबीएस विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. दोन्ही इंजिनमध्ये पक्षी आदळल्याचा अंदाज आहे.