12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा

 12 आणि 28 टक्क्यांचा GST स्लॅब होणार रद्द, सर्वसामान्यांना फायदा

नवी दिल्ली, दि. २१ : केंद्र सरकारनं आता 5 टक्के आणि 18 टक्के GST स्लॅब सुरु ठेवले आहेत 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे बंद होणार आहेत आज झालेल्या बैठकीत मंत्रिगटानं केंद्र सरकारचा प्रस्ताव स्वीकारला आहे. सध्या जीएसटीचे चार स्लॅब आहेत. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के या चार पैकी दोन स्लॅब बंद केले जाणार आहेत. त्यामध्ये 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा स्लॅब पूर्णपणे संपवण्यात येईल. यामुळं सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळेल, असं सांगितलं जात आहे.

12 टक्के स्लॅबमध्ये असलेल्या वस्तू आणि सेवा 5 टक्क्यांमध्ये येईल. तर, 28 टक्के स्लॅबमधील जवळपास 90 टक्के वस्तू 18 टक्क्यांमध्ये येतील. तंबाखू आणि पान मसाला याच्यावर अधिक जीएसटी अधिक असेल.

आरोग्य आणि जीवन विा यावरील जीएसटी माफ करण्याच्या प्रस्तावावरही आज मंत्रिगटाच्या बैठकीत चर्चा झाली. यामध्ये वैयक्तिक आरोग्य विमा आणि जीवन विम्यावरील प्रीमियमवर जीएसटी माफ करण्याचाबाबत चर्चा झाली. जर हा प्रस्ताव मान्य झाला तर आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसीवर थेट परिणाम होईल. सध्या यावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो.

या वस्तू होणार स्वस्त

12 टक्के स्लॅब मधून 5 टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू

12 टक्के स्लॅब बंद करुन त्यातील वस्तू आणि सेवा 5 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणल्यानं कर 7 टक्क्यांनी कमी होईल. यामुळं कपडे आणि रेडिमेड कपडे, चप्पल, बूट, प्रिंटिंग आणि स्टेशनरी वस्तू, प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ, होम अप्लायन्सेस वरील कर कमी होईल. या बदलाचा थेट परिणाम मध्यम वर्गावर आणि सर्वसामान्य ग्राहकावर होईल.

28 टक्के स्लॅबमधून 18 टक्के स्लॅबमध्ये येणाऱ्या वस्तू
28 टक्के स्लॅबमधील जवळपास 90 टक्के वस्तू 18 टक्के स्लॅभमध्ये आणल्यानं त्या वस्तूंच्या किंमतीवर लागणारा कर 10 टक्क्यांनी कमी होईल. यामुळं दुचाकी वाहनं, चार चाकी कार, सीमेंट आणि बिल्डींग मटेरियल, फ्रीज, वॉशिंग मशीन, एअर कंडीशनर, टीव्ही याचा समावेश होतो. पॅकेजमधील अन्नपदार्थ, बेवरेजेस, पेंटस आणि वॉर्निश यावरील कर कमी होतील. यामुळं ग्राहकांसह रिअल इस्टेट आणि ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये विक्रीत तेजी येऊ शकते. GST slabs of 12 and 28 percent to be abolished

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *