वाढणारे वाघ आणि बिबटे आता खासगी प्राणीसंग्रहालयात

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील वाघ आणि बिबटे यांची वाढणारी संख्या लक्षात घेता खाजगी उद्योजकांच्या मार्फत खाजगी प्राणी संग्रहालये तयार करून या वाढणाऱ्या संख्येला तिथे स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी यासंदर्भातल्या एका लक्षवेधी सूचनेच्या दरम्यान दिली. विजय वडेट्टीवार आणि इतरांनी ही लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.
सन 2000 साली राज्यातील वाघांची संख्या 101 इतकी होती ती आता वाढून 444 इतकी झाली आहे. असलेली वन जमीन वाढणार नाही आणि त्यातून वाढणारी ही संख्या नागरीवस्ती कडे वळत असल्याने त्यातून मानव आणि वन्य प्राणी यांच्यातील संघर्ष तयार होत आहे यावर उपाय म्हणून अशा पद्धतीचे खाजगी प्राणी संग्रहालय तयार करणे हा विचार वनविभाग करत आहे असं मंत्री म्हणाले.
जंगलाच्या गाभा क्षेत्रात तृणभक्षी प्राण्यांसाठी फळझाडे आणि संबंधित वनस्पती तयार करण्याच्या सूचना वनविभागाच्या सर्व नर्सरीना देण्यात आले आहेत त्यामुळे ही हिंस्त्र प्राण्यांना गाभा क्षेत्रातच त्यांचे भक्ष मिळेल आणि ते नागरी वस्तीत येणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असं ही मंत्र्यांनी या उत्तरामध्ये स्पष्ट केलं. हा विषय राज्यभराचा असल्याने आपल्या दालनात येत्या शुक्रवारी वाघ आणि बिबटे यांच्या संदर्भातील बैठक आयोजित करण्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यावेळी केली. सुमारे 200 कोटी रुपये खर्चून सोलर फेंसिंगची योजना कार्यान्वित केली जात आहे असेही मंत्री म्हणाले.
बोगस औषधे, विरोधकांचा सभात्याग
राज्यातील अनेक सरकारी महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये भेसळयुक्त औषधांचा पुरवठा झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली असा संताप्त सवाल सभागृहातील सत्ता रोड आणि विरोधी सदस्यांनी केला मात्र त्यावर अपेक्षित उत्तरं आल्याने विरोधकांनी या लक्ष वेधिसूचनेदरम्यान सभा त्या केला
सुनील प्रभू आणि इतरांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती त्यावर अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी जिरवाळ आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी उत्तरे दिली बोगस औषधे खरी करणार खरेदी करणारे दोषी आहेतच त्यांच्यावर अधिवेशन संपल्यापूर्वी कारवाई केली जाईल असं मंत्री आंबेडकर यांनी सांगितलं राज्यातील बहुतांश सर्व ठिकाणी रुग्णालयांमध्ये औषधांची तपासणी केली जात आहे आणि संबंधित बोगस औषध उत्पादनांवर कारवाई देखील केली जात आहे असं मंत्री झिरवाळ यांनी यावेळी सांगितलं होतं
ML/ML/SL
5 March 2025