अवकाळी पावसामुळे भुईमुग पिकाचे नुकसान…

बुलडाणा दि २२ — सध्या भुईमूग काढणीला वेग आलेला आहे, आणि अशातच गेल्या दहा-बारा दिवसापासून बुलडाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे भुईमूग काढण्यासाठी शेतकऱ्याची तारांबळ उडत आहे. अनेक शेतकऱ्यांची शेंग भिजली आहे, आधीच वातावरणातील बदलामुळे उत्पन्नात मोठी घट झाली आहे, आणि आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा एकदा हिराऊन घेतल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, भुईमुगाच्या शेंगा पावसात भिजल्याने भावांमध्ये मोठा फटका बसणार असल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची भरपाई उन्हाळी भुईमूग पिकातून निघणार अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र या आशेवर आता पाणी फिरल्याचे दिसून येत आहे…