Grok AI ला सरकारने आणले वठणीवर, शेकडो आक्षेपार्ह अकाऊंट्स डिलिट

 Grok AI ला सरकारने आणले वठणीवर, शेकडो आक्षेपार्ह अकाऊंट्स डिलिट

मुंबई, दि. 13 : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X ने Grok AI च्या माध्यमातून प्रसारित आणि प्रसिद्ध होणाऱ्या अश्लील कंटेंटबाबत अखेर चुक कबुल केली आहे. अगोदर आडमुठेपणा करणारा हा प्लॅटफॉर्म सरकारने कायद्याचा बडगा उगारताच आता वठणीवर आला आहे. कंपनीने केंद्र सरकारला विश्वास दिला आहे की, कंपनी ही भारतीय कायद्यानुसारच काम करेल.

याशिवाय कंपनीने ग्रोक प्लॅटफॉर्मवरील जवळपास 3,500 पोस्ट ब्लॉक केल्या आहेत. तर 600 हून अधिक अकाऊंट डिलिट केली आहेत. सरकारच्या कडक भूमिकेनंतर X ने कंटेंट मॉडरेशन अधिक कठोर केले आहे. ऑनलाईन अश्लीलता आणि महिलांना लक्ष्य करण्याविरोधात सरकारने मोठी भूमिका घेतली होती.

केंद्र सरकारने X च्या AI टूल Grok मार्फत अश्लील आणि विचित्र कंटेंट प्रसारित होत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. सरकारी यंत्रणांनुसार, Grok चा वापर केवळ फेक प्रोफाईल तयार करण्यासाठीच नाही तर महिलांना त्रास देण्यासाठी आणि ऑलनाईन त्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात येत होता. यामध्ये इमेज एडिटिंग, सिथेंटिक कंटेंट, तर चुकीचा प्रॉम्प्ट्स वापरुन महिलांची छायाचित्र आणि व्हिडिओचा दुरुपयोग करण्यात येत होता. त्यानंतर सरकारने हा कंटेंट हटवण्यास सांगितले होते. एक्सला याविषयीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते.

सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, X ने जवळपास 3,500 आक्षेपार्ह पोस्ट ब्लॉक केल्या. यासह 600 हून अधिक खाती या प्लॅटफॉर्मवरून हटवली आहेत. या खात्यावरून अश्लील, असभ्य आणि गैरकायदेशीर कंटेंट प्रसारित आणि प्रसिद्ध करण्यात येत होता. सरकारने त्यावर चिंता व्यक्त केल्यानंतर एक्सने तातडीने पावलं टाकली. आता असा कंटेंट रोखण्यासाठी सिस्टम आणि मॉनिटरिंग अधिक कडक करण्यात आली आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *