स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नृत्याविष्कारातून अभिवादन

 स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त नृत्याविष्कारातून अभिवादन

नाशिक, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 28 मे रोजीच्या 141 व्या जयंतीनिमित्त नाशिकमधील कलानंद कथक संस्थेच्या कलाकारांनी अनादि मी अनंत मी या कार्यक्रमाद्वारे सावरकरांच्या गीतांवर विविध आविष्कार सादर करीत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. वृषाली पाठक आणि त्यांच्या 16 सहकालाकारांनी कथक माध्यमातून सावरकरांचा संपूर्ण चरित्र पट सादर केला.

गुणगौरव न्यास या संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वंशज महिला शाहीर विनता जोशी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी विनता जोशी यांच्या हस्ते सावरकर प्रेमी द ऑनलाइन या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. सावरकरांची विविध अकरा पुस्तके या वेबसाईटवर उपलब्ध असून सावरकर साहित्य वाचण्याची प्रेरणा देणे हा वेबसाईटचा उद्देश आहे. यावेळी सावरकरांविषयी आपले विचार व्यक्त करताना विनता जोशी म्हणाल्या की सावरकरांचे विचार अनादी अनंत आणि कालातीत आहेत. त्यांच्या विचारांना मारणारा शत्रू अद्याप जन्माला आलेला नाही.

कवी, लेखक ,नाटककार, समाजसुधारक , भाषा शुद्धी करणारे , विज्ञानानिष्ठ आणि सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांचे हिंदुत्व फार विशाल आहे ते धर्म आणि रूढीच्या कचाट्यात अडकलेले नाही असेही त्या म्हणाल्या. अनादी मी अनंत मी या कार्यक्रमांमध्ये सावरकरांच्या जयोस्तुते श्री महन मंगले, ने मजसी ने परत मातृभूमीला, शिवरायांची आरती हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा, अनादि मी अनंत मी आदी विविध गीतांवर नृत्याविष्काराद्वारे सावरकरांना अभिवादन करण्यात आले. नाशिक मधील गुरुदक्षिणा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास सावरकर प्रेमींनी गर्दी केली होती.

ML/ML/SL

27 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *