देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प चंद्रपुरात

 देशातील पहिला ग्रीनफिल्ड कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प चंद्रपुरात

चंद्रपूर दि १४ :- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती एमआयडीसी परिसरात देशातील पहिल्या ग्रीनफिल्ड कोळसा गॅसिफिकेशन ‘कोळसा ते रसायने’ प्रकल्पाचे भूमिपूजन पार पडले. न्यू एरा क्लीनटेक आणि ग्रेटा कंपनीकडून उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कोळसा व खाणमंत्री जी. किशन रेड्डी यांच्या उपस्थितीत झाले.

सुमारे 3300 हेक्टर जागेवर हजारो कोटींची गुंतवणूक करून हा प्रकल्प उभारला जाणार असून, दरवर्षी ५० लाख मेट्रिक टनांहून अधिक कोळशावर प्रक्रिया करून विविध उच्च मूल्याची रसायने तयार केली जाणार आहेत. या संकुलात गॅसिफिकेशनसह कार्बन कॅप्चर अँड युटिलायझेशन (CCUS) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. मीथेनॉल, हायड्रोजन, इथेनॉल, युरिया तसेच शाश्वत विमान इंधन यांसारखी उत्पादने येथे तयार होणार आहेत. या प्रकल्पांमुळे रसायन आयातीवरील अवलंबित्व कमी होण्यासोबतच विदर्भात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असून आत्मनिर्भर भारत संकल्पनेला मोठे बळ मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

दुसरीकडे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडू न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 30 वर्षांपूर्वी कवडीमोल दरात घेतलेल्या या शेतजमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना काहीही मिळालेले नाही. ज्या प्रकल्पासाठी या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या, तो प्रकल्प कधी झालाच नाही. त्यामुळे नोकरीच्या प्रतीक्षेत एक पिढी गेली. मात्र आतातरी त्यांच्या कुटुंबीयांना सानुग्रह अनुदान आणि नोकरी मिळावी, अशी मागणी खासदार धानोरकर यांनी केली.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *