वन्यजीव शुश्रूषा केंद्रात उष्माघातापासून बचावासाठी ग्रीन नेट आणि कूलर

चंद्रपूर दि २४:–चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान पुन्हा एकदा देशात अव्वल ठरले आहे. मंगळवारी शहर जिल्ह्यात 45.8 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. चंद्रपूर जिल्हा जंगलाचा आणि वाघांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील वन्यजीव शुश्रूषा केंद्रात विविध भागातून वेगवेगळ्या कारणांसाठी आणलेले आणि सध्या बंदिस्त असलेले बंदिस्त वाघ-बिबटे यांना उष्माघातापासून बचावासाठी वनविभाग सतर्कत बाळगत आहे. या सर्व पिंजऱ्याना ग्रीन नेट आणि कूलर लावून तापमानापासून दिलासा दिला जात आहे. यासह पशुवैद्यकीय अधिकारी या वन्यजीवांवर नियमित नजर ठेवत आहेत.