विश्वचषक हॉकी स्पर्धेचे शानदार उद्घाटन
भुवनेश्वर, 12 (भुवनेश्वर) : पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा 2023 दिमाखदार उद्घाटन सोहळा आज पार पडला. कटक येथील बाराबती स्टेडियमवर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा सुमारे 2.30 तास चालला. मनीष पॉल आणि गौहर खान यांनी हा शो होस्ट केला होता. बॉलिवूड स्टार्स दिशा पटानी, रणवीर सिंग आणि संगीतकार प्रीतम यांनी त्यांच्या क्रू मेंबर्ससह परफॉर्म केले. प्रीतम ‘इलाही’ सारख्या गाण्याने रंगमंचावर पोहोचला. त्यांच्यासोबत बॉलीवूड गायक बेनी दयाल आणि नीती मोहन यांनीही परफॉर्म केले. कोरियन पॉप-बँड ब्लॅकस्वाननेही स्टेडियममध्ये बसलेल्या 40,000 प्रेक्षकांसमोर परफॉर्म केले.
आता उद्या पासून (दि. १३) विश्वचषक हॉकी स्पर्धेला भारतातील ओडिशा येथे सुरुवात होणार असून यात 16 संघानी सहभाग नोंदवला आहे. विश्वचषकाचे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियम आणि राउरकेला येथील बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियमवर होणार आहेत. या विश्वचषकासाठी क्रीडा प्रेमी उत्साहित असून यंदाचा विश्वचषक कोण पटकावणार याकडे सर्वांचे लक्ष असेल.
13 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत 16 संघांमध्ये एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. त्यानंतर 19 जानेवारीपर्यंत गट सामने आणि 24 जानेवारीपासून उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळवले जातील. पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना हा 29 जानेवारीला होणार आहे. 16 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. भारताचा पहिला सामना 15 जानेवारी रोजी इंग्लड सोबत होणार आहे. तर दुसरा सामना भारत विरुद्ध वेल्स यांच्यात 19 जानेवारीला होईल.
SL/KA/SL
12 Jan. 2023