श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य

 श्रीमंत दगडूशेठ गणपतीला ४५१ मिष्टान्नांचा महानैवेद्य

पुणे, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मिठाई, फराळाच्या तिखट-गोड अशा वेगवेगळ्या पदार्थांचा तसेच विविध प्रकारच्या फळांचा आणि भाज्यांचा महानैवेद्य श्रीमंत दगडूशेठ गणपती समोर दाखविण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमे
निमित्त श्रीं ना तब्बल ४५१ प्रकारचे मिष्टान्न अर्पण करण्यात आले होते. लाडक्या बाप्पासमोर मांडलेल्या वेगवेगळ्या पदार्थांचा भव्य अन्नकोट पाहण्याकरिता पुणेकरांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने मंदिरात गर्दी केली. Great offering of 451 sweets to rich Dagdusheth Ganapati

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ४५१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ML/KA/PGB
26 Nov 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *