एका वर्षात मिळणार Gratuity चे पैसे

 एका वर्षात मिळणार Gratuity चे पैसे

मुंबई, दि. १२ : केंद्र सरकारने कामगार कायद्यात काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे. केंद्र सरकारने चार कामगार कायदे लागू केली. यामध्ये वेतन , औद्योगिक संबंध, सामाजिक सुरक्षा आणि व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाज यांचा समावेश आहे. या कोड्समध्ये जुने 29 कायदे एकत्रित करण्यात आले आहेत. आता कोणत्याही कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळवण्यासाठी किमान 5 वर्षे सलग कंपनीत काम करणे आवश्यक होते. पण आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता केवळ 1 वर्ष काम केल्यानंतरही ग्रॅच्युइटीचा अधिकार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

नव्या कामगार कायद्यानुसार फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना एका वर्षाच्या सेवेनंतर ग्रॅच्युइटी मिळू शकते. एक वर्ष सेवा म्हणजे 240 दिवस काम. फिक्स्ड कर्मचाऱ्यांना 240 दिवसांसाठी काम केले असल्यास प्रो रेटाच्या आधारे ग्रॅच्युइटी द्यावी लागले. दरम्यान, स्थायी (परमनंट) कर्मचाऱ्यांन पाच वर्षाच्या सेवेवर ग्रॅच्युइटीचा लाभ मिळू शकणार आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *