भव्य राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन ठाण्यात
ठाणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यात २२ एप्रिल रोजी ‘ आम्ही सिद्ध हस्त लेखिका ‘ संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे जिल्हा शाखेतर्फे मो ह विद्यालया च्या तृप्ती बॅंक्वेटहाॅल येथे एकदिवसीय राज्यस्तरीय भव्य महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधी ४०० लेखिका उपस्थित राहणार आहेत.
सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात ग्रंथ दिंडी , उद्घाटन सोहळा , मुलाखती, निमंत्रितांचे कविसंमेलन, परिसंवाद , पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण अशा भरगच्च कार्यक्रमाची मेजवानी साहित्य रसिकांना देण्यात येणार आहे आणि अनेक दिग्गज लेखिका मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध सुपरिचित लेखिका वीणा गवाणकर यांच्या हस्ते होणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून नागपूरच्या सुप्रसिद्ध लेखिका आणि राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगी भडभडे यांना आमंत्रित केले आहे.
ठाण्याच्या साहित्य आणि समाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या अॅड माधवी नाईक प्रमुख पाहुण्या लाभल्या आहेत. स्वागताध्यक्षांची जबाबदारी संस्थेच्या विश्वस्त उषा चांदुरकर यांनी स्वीकारली आहे..अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रा पद्मा हुशिंग यांनी दिली.
याच दिवशी .सुप्रसिद्ध लेखिका मंगला गोडबोले आणि सुप्रसिद्ध लेखिका आणि निवेदिका मंगला खाडीलकर यांच्या मुलाखतीचा समावेश असेल. महाराष्ट्रातील पुरस्कार प्राप्त आणि निमंत्रित कवयित्रींचे बहारदार कविसंमेलन ती च्या कविता या विषयावर संपन्न होईल..
संस्थेकडून या वर्षी साहित्य तपस्विनी हा पुरस्कार संमेलनाध्यक्ष शुभांगी भडभडे यांना प्रदान करण्यात येणार आहे.
ती बोलू लागलीया परिसंवादात विविध क्षेत्रातील मान्यवर लेखिका सहभागी होणार आहेत..
संस्थेतील नवोदित लेखिकांचे पुस्तक प्रकाशन मान्यवरांच्या साक्षीने होणार आहे. संस्था स्थापनेनंतर केवळ दोन वर्षात राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिला संमेलनात सहभागी होऊ इच्छितात त्यांनी अस्मिता चौधरी…9820119861, प्रतिभा चांदुरकर..9821486273 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
ML/KA/SL
13 April 2023