मंगलामुखी तृतीय पंथीय महासंमेलनाचा भव्य शुभारंभ

वाशीम, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वाशीम जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील मंगलामुखी तृतीय पंथी महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या महासंमेलनाचा मुख्य आकर्षण वाशीम शहरातुन निघालेली भव्य कलश यात्रा ठरली. या यात्रेत संपूर्ण भारतातून आलेल्या तृतीय पंथीयांनी सहभाग घेतला. शहरातील पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्स येथून वाशीम शहराचे आराध्य दैवत बालाजी मंदिरापर्यंत ही यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली.
या यात्रेत सहभागी तृतीय पंथीय समाजातील सदस्यांनी नृत्याचा आनंद घेत रस्त्यावर भक्तिमय वातावरण निर्माण केले. यावेळी आयोजक किरण अम्मा आणि शहनाज नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे महासंमेलन देशभरातील किन्नर समाजाच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी तसेच शासन आणि समाजाच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.