दीक्षाभूमीवर भव्य महिला धम्म परिषदेचे आयोजन

नागपूर, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे यावर्षीही एक दिवसीय महिला धम्म परिषदेचे आयोजन आज नागपुरातील दीक्षाभूमी येथे प. पू. डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि दीक्षाभूमी महिला धम्म संयोजन समिती यांच्यातर्फे करण्यात आले. यावेळी माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलाताई गवई, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. राजेंद्र गवई यांच्यासह अनेक महिला आंबेडकरी विचारवंत उपस्थित होत्या.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातून महिलांना त्यांचे अधिकार, हक्क दिले आहेत या अधिकार आणि हक्काच्या बौद्ध समाजातील महिलांनी योग्य वापर करून स्वतःचा, समाजाचा आणि देशाचा विकास करावा असे आवाहन माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई यांनी केले. यावेळी विविध महिला आंबेडकरी विचारवंतांनी आपले विचार व्यक्त करीत संवैधानिक मूल्य जपून महिलांनी आपल्या हक्कासाठी लढा द्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. बौध्द समाजातील महिलांनी एकत्र येऊन संविधानाला बळकट करण्यासाठी प्रयत्न करावे आणि शोषित वंचित महिलांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन केले.
SL/KA/SL
21 Oct. 2023