आम्हालाही कर्नाटकात जायचं आहे ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव

 आम्हालाही कर्नाटकात जायचं आहे ‘या’ ग्रामपंचायतीचा ठराव

सांगली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जत तालुक्यात उमदी, तिकोंडी, उमराणी पाठोपाठ सिद्धनाथ येथील नागरिक कर्नाटकात जाण्यासाठी इच्छुक आहेत. याबाबत ग्रामपंचायतीने ठराव करण्याचा निर्णय घेतला. ग्रामस्थांनी कर्नाटकचे झेंडे हातात घेऊन गावातून पदयात्रा काढली. कर्नाटक सरकारच्या बाजूने घोषणा दिल्या. Grams panchayat resolution want to go to Karnataka

जत पूर्व भागातील सिद्धनाथ गावापासून दोन किलो मीटरवर कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्याची सीमा आहे.कर्नाटक सरकार तीन वर्षांपासून मोफत तुबची- बबलेश्वर योजनेचे पाणी ओढापात्रात सोडत आहे. कर्नाटक सरकार त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सुविधा आणि अनुदान देते.

महाराष्ट्र सरकार म्हैसाळचे पाणी देणार असल्याचे सांगत ५० वर्षांपासून टाळाटाळ करीत आहे.आम्हाला महाराष्ट्र सरकार कोणत्याही सुविधा देत नाही, अशी येथील ग्रामस्थांची भावना आहे.

सिद्धनाथ महाराष्ट्रात असून येथे उच्च शिक्षणाची सोय नाही. भाषेची अडचण आहे. येथे कर्नाटक महामंडळाच्या चार बसेस तर महाराष्ट्राच्या दोन बस येतात. गाव पाण्यापासून वंचित आहे. मागणी, पाठपुरावा करूनही एसटी, म्हैसाळ योजनेचे पाणी मिळत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी कर्नाटकचा ध्वज घेऊन सिद्धेश्वर मंदिरासमोरून बसवेश्वर चौकापर्यंत पदयात्रा काढली.

कर्नाटकात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.सिद्धनाथ गावात कन्नड माध्यमाची माध्यमिक शाळा आहे. सातवीपर्यंत मराठी शाळा असताना पुढे माध्यमिक शाळा नाही.

SL/KA/SL

29 Nov. 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *