ग्रामपंचायतीचे राजकारण पेटले,तलवारीने हल्ला

 ग्रामपंचायतीचे राजकारण पेटले,तलवारीने हल्ला

बीड, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :ग्रामपंचायत grampanchayat निवडणुकीच्या प्रचाराची काल रणधुमाळी थांबली आहे. प्रचार संपताच अंतर्गत गटबाजी समोर आलेली  पाहायला मिळाली आहे. बीडच्या दगडी शाहजनापूर इथं ग्रामपंचायत निवडणूक सुरू आहे.  काल सायंकाळच्या वेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाच्याने मामावर चक्क तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरात उघडकीस आलाय.

 

पहिला वार केल्यानंतर दुसरा वार करण्याअगोदरच पोलिसांनी भाच्याला पकडले. त्यामूळे मोठी दुर्घटना टळलीय.

 

प्राप्त माहितीनुसार, शिवाजीराव चव्हाण असं जखमी व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामपंचायत मतदानाच्या पूर्वसंध्येलाच तलवारबाजी झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

 

मामा चव्हाण आणि भाचा जाधव या दोघांची भेट बीड येथील राजीव गांधी उद्यानासमोर झाली. शाब्दिक बाचाबाचीतून हाणामारी जुंपली भाचा धोंडीराम जाधवने मामावर तलवारीने वार केला तेवढ्यात जवळच चौकात उभे असलेल्या दोन पोलीस हवालदार तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यानी तलवार जप्त केल्याने अनर्थ टळला. सध्या जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ML/KA/PGB

17 Dec 2022

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *