राज्यपालांचे महाराणा प्रताप यांना अभिवादन

मुंबई दि २९– महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज (दि २9) राजभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, उपसचिव एस. राममूर्ती तसेच राजभवनातील अधिकारी, कर्मचारी व पोलीस दलातील अधिकारी व जवान उपस्थित होते.
Governor pays tributes to Maharana Pratap on birth anniversary