कामगार नेते गोविंदराव मोहिते यांचा सोमवारी अभिष्ठचिंतन सोहळा!

मुंबई, दि 1
राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांचा अमृतमहोत्सवपूर्ती सोहळा सोमवार २ रोजी दुपारी दोन वाजता मनोहर फाळके सभागृह,परेल येथे संपन्न होणार! कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर भुषविणार असू़न,त्यांच्याच शुभहस्ते गोविंदराव मोहिते यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात येईल.खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर, सेक्रेटरी शिवाजी काळे उपस्थित राहून,सरचिटणीस श्रीमोहिते यांच्या कामगार, सहकार, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील निष्ठापूर्वक कामाचा गुणगौरव करण्यात येईल.