डाक विभागाच्या तिकीट प्रदर्शनाचे राज्यपालांनी केले उद्घाटन
मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र परिमंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय डाक तिकीट प्रदर्शनाचे (महापेक्स २०२५) उदघाटन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते आज जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे झाले. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नाशिक येथील पांडव लेणी वरील स्थायी सचित्र विरूपण प्रकाशित करण्यात आले, तसेच मूलचंद जी शाह यांच्या जीवनावर आधारित कस्टमाइज्ड माय स्टॅम्पचे अनावरण करण्यात आले.
राज्यपालांच्या हस्ते महापेक्सच्या बोधचिन्हाचे उदघाटन करण्यात आले तसेच जागतिक व्यापार केंद्र मुंबई, ब्रेल लिपी तसेच डाक सेवा इ सायकल अभियानावर आधारित विशेष आवरणाचे देखील प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र तथा गोव्याचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अमिताभ सिंह, जागतिक व्यापार केंद्र मुंबईचे संचालक विजय कलंत्री, टाइम्स ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकारी भावना रॉय, मानेक शाह, काही देशांचे वाणिज्यदूत , देशाच्या विविध भागातून आलेले पोस्ट तिकीट संग्राहक उपस्थित होते. महापेक्स हे प्रदर्शन ४ दिवस सुरु राहणार असल्याचे सांगण्यात आले.
Maharashtra Governor C P Radhakrishnan inaugurated the 4 – day MAHAPEX 2025 the State Level Philatelic Exhibition organised by the Maharashtra Postal Circle at World Trade Centre in Mumbai.
The Governor released the Logo of the Exhibition and also released the Permanent Pictorial Cancellation on Pandav Leni near Nashik and Customised My Stamp on Mulchand G Shah.
ML/ML/SL
22 Jan. 2025