राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

मुंबई दि १८ : महाराष्ट्र व गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी दिवाळीनिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळीचा सण अंधकारावर प्रकाशाचा, अन्यायावर न्यायाचा आणि नकारात्मकतेवर सकारात्मकतेच्या विजयाचे प्रतीक आहे. या निमित्त सर्वांना स्वदेशी उत्पादनांचा स्वीकार करण्याचे आवाहन करतो.
पर्यावरण रक्षण, नैसर्गिक संसाधनांचा आदर आणि नैसर्गिक शेती यासारख्या शाश्वत जीवन मूल्यांचा अवलंब करून उज्ज्वल, समृद्ध आणि स्वावलंबी भारताच्या उभारणीत सहभागी व्हावे, असे आवाहन करतो. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, शांती, आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो या शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
Governor Acharya Devvrat greets citizens happy Diwali
ML/ML/SL