महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत ह्यांचे मुंबईत आगमन

मुंबई, दि १४: महाराष्ट्राचे नवे राज्यपाल आचार्य देवव्रत ह्यांचे रविवारी दुपारी १:०० च्या दरम्यान मुंबईत आगमन झाले .त्यांच्या स्वागतासाठी खास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबई सेंट्रल स्थानकावर हजर राहिले होते. ह्यावेळ बँड पथकाने राज्यपालांचे जोरदार स्वागत केलेले पाहून राज्यपालांनी सुद्धा जोरदार सॅल्युट ठोकला.
देव व्रत गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत पण त्यांना सध्या महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार तात्पुरता म्हणजेच प्रभारी म्हणून सोपवण्यात आला आहे . महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा शपथविधी सोमवारी १५ तारखेला पार पडणार आहे त्या सोहळ्यासाठी राज्यपाल खास मुंबईत आले आहे.
एनडीएने उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी दिल्यामुळे आधीचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन विजय होऊन उपराष्ट्रपदी विराजमान झाले आहेत .त्यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण होणार ह्याची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावर आचार्य देवव्रत ह्यांचे नाव जाहीर करण्यात आले आणि चर्चांना विराम मिळाला होता.
२०१५ ते २०१९ पर्यंत आचार्य देवव्रत ह्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपालपद भूषवले आहे. गुजरातचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांची २०१९ ला नियुक्ती झाली होती.पण आता त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.त्याच बरोबर देवव्रत एक शिक्षण तज्ञ आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात.KK/ML/MS