राज्यभरात आरोग्य पायाभूत सुविधा उभारण्यावर सरकारचा भर

ठाणे दि ३०– कोरोना च्या काळात आरोग्याच्या समस्यांचा सर्वांनी वाईट अनुभव घेतला आहे. परिणामी आरोग्याच्या दुष्टीने पायाभूत सुविधा उभारण्यासाठी देण्यावर आमच्या सरकारचा भर आहे असे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले . शुक्रवारी ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंदआश्रम येथे शिंदे -फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने जल्लोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
टेंभी नाका येथील आनंद आश्रमाच्या बाहेर आयोजित जल्लोष कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लहान मुले, महिला, पोलीस कर्मचारी यांच्या समवेत तीस किलोचा केक कापून आनंद साजरा केला . यावेळी शिंदे यांच्या सोबत आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थितीत होते.
यानंतर बोलतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपा युतीसाठी मते मागितली होती.पण दुर्दैवाने निकाल लागताच काही जणांनी वेगळेच खुलासे केले. ज्यांच्या मनात काळे होते त्यांनी आम्हाला सर्व दरवाजे उघडे आहेत असे सांगितले असा टोला मुखमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. परिणामी त्यानंतर लोकांना जे नको होते ते झाले असा खुलासाही शिंदे यांनी केला. Government’s emphasis on building health infrastructure across the state
महाविकास आघाडीत सामान्य माणसांचा श्वास गुदमरू लागला होता. शिवसेनेचे अस्तित्व धोक्यात आले होते. त्यातून शिवसैनिकांचे खच्चीकरण झाले. हे थांबवण्यासाठी मला धाडस करावे लागले.असे स्पष्टीकरण शिंदे यांनी त्यांच्या बंडाबाबत दिले. आम्ही सर्वानी सामान्य शिवसेनीकांच्या उद्रेकाला वाचा फोडण्याचे काम केले.असे ही मुख्यमंत्री पुढे म्हणाले.सर्व सामान्य नागरिकांना न्याय देण्याचे काम आमच्या सरकारने वर्षभरात केले असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
ML/KA/PGB
30 Jun 2023