आंतरराष्ट्रीय नेमबाज राही सरनोबतचा ८ वर्षांचा पगार शासनाने थकवला

कोल्हापूर,दि. १५ : आपल्या देशात खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय पदकांची अपेक्षा केली जाते. आपण त्यांच्या कामगिरीचा अभिमानही बाळगतो मात्र शासनाकडून त्यांच्या कामगिरीककडे सपशेल दुर्लक्ष होत असते. कोल्हापुरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत ही आठ वर्षे पगाराविना राहिल्याची माहिती समोर आली आहे, 2014 साली राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पहिले तीन वर्षे पगार झाल्यानंतर पुढील आठ वर्षे शासनाकडून पगार मिळाला नाही. राही सरनोबत हिने प्रशिक्षनाची तीन वर्षे पूर्ण केली नसल्याने तिला हा आठ वर्षांचा पगार दिला नाही असं प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिले जात आहे, मात्र राही सरनोबत नेहमीच भारतीय टीमची खेळाडू होती त्यामुळे तिला प्रशिक्षणासाठी तिला वेळ नव्हता, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राही सरनोबत हिच्या अडचणींमध्ये लक्ष्य घातल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, या घटनेमुळे प्रशासनाचा अजब कारभार समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे.
कोल्हापुरची राही रसनोबत ही आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे. तिने भारतासाठी अनेक पदकं मिळवली आहेत. मात्र गेल्या आठ वर्षांपासून तिला पगार दिला जात नाही. त्याचं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे प्रशिक्षणाची तीन वर्षे तिने पूर्ण न केल्याने तिचा पगार दिला जात नाही. मात्र, यामुळे राही सरनोबतच्या अडचणी यामुळे वाढल्या आहेत, कोणत्याही बॅंकेकडून तिला लोन घेता येत नाहीये, 2014 साली तिची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात झाली आहे, त्यानंतर पहिली 3 वर्षे तिचा पगार वेळेवर आला होता. मात्र, त्यानंतर प्रशिक्षणाचे तीन वर्षे पूर्ण केले नाहीत म्हणून तिचा पगार थांबवला आहे, मात्र, त्यावेळेपासून आत्तापर्यंत राही सरनोबत भारतीय संघाची एक भाग राहिलेली आहे, एक चांगली खेळाडू म्हणून राहिली आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी तिला इतका मोठा कालावधी मिळाला नाही, त्यामुळे राहीने आणि तिच्या कुटूंबाने प्रशासनाकडे वारंवार यासंदर्भात दाद मागितली मात्र त्यांना कुठेही प्रतिसाद मिळाला नाही, आता अजित पवारांनी यामध्ये लक्ष घातलं आहे. काही दिवसापूर्वी राहीने आणि तिच्या कुटूंबाने अजित पवारांची भेट घेतली होती. या अडचणी त्यांनी अजित पवारांना सांगितल्या, त्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं आहे.
2014 साली राही सरनोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पहिले तीन वर्षे पगार झाल्यानंतर पुढील आठ वर्षे शासनाकडून पगार मिळाला नाही. राही सरनोबत हिने प्रशिक्षनाची तीन वर्षे पूर्ण केली नसल्याने तिला हा आठ वर्षांचा पगार दिला नाही असं प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिले जात आहे,