आयकरासाठी Form 16 विसरा, सरकार आणणार नवीन फॉर्म

 आयकरासाठी Form 16 विसरा, सरकार आणणार नवीन फॉर्म

नवी दिल्ली, दि. २६ : नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होत आहे. यानुसार आता फॉर्म १६ च्या जागी फॉर्म १३० येणार आहे. या फॉर्ममध्ये कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराबद्दल, कर कपातीबद्दल आणि कर जमा करण्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. हा नवीन फॉर्म आयकर कायदा २०२५ अंतर्गत येईल. मात्र, त्याचे कार्य फॉर्म १६ प्रमाणेच राहील. तुमच्या पगारातून किती कर कापला गेला आहे आणि सरकारकडे जमा केला गेला आहे हे तो दर्शवेल. कर्मचाऱ्यांना पहिला फॉर्म १३० १५ जून २०२७ पर्यंत मिळेल. त्यात २०२६-२७ या कर वर्षाची माहिती असेल. जून २०२६ मध्ये फॉर्म १६ अजूनही उपलब्ध असेल, ज्यात २०२५-२६ ची माहिती असेल.

फॉर्म १३० तीन भागांमध्ये विभागलेला असेल. भाग ‘अ’ मध्ये कर्मचारी आणि कंपनीची माहिती असेल. भाग ‘ब’ मध्ये कर कपातीचा तपशील असेल. भाग ‘क’ मध्ये संपूर्ण कर गणना दिलेली असेल.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *